प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
सातारा : पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मोठ्या भावाने लहान भावाला सुरीने भोसकले. यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात मोठ्या भावावर गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना अंगापूर वंदन, ता. सातारा गावच्या हद्दीत दि. ३० जानेवारीला रात्री नऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी तरुण २२ वर्षांचा असून तो कोरेगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. त्याचे त्याच्या वहिनीसेबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या माेठ्या भावाला होता. या संशयातूनच मोठ्या भावाने त्याच्या पोटात सुरी खुपसून त्याला गंभीर जखमी केले.
या झटापटीत सुरी तुटली. तुटलेल्या अर्धवट मुठीने त्याने कपाळावर मारून जखमी केले. यामध्ये जखमी झालेल्या लहान भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने जबाब दिल्यानंतर मोठ्या भावावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राऊत हे अधिक तपास करीत आहेत.