कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. हा धक्का ३.१ रिक्टर स्केलचा होता आणि धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १६ किलोमीटर अंतरावर म्हणजे, पाटण तालुक्यातील हेळगावच्या नैर्ऋृत्येला सहा किलोमीटर अंतरावर, जमिनीपासून ९ किलोमीटर खोल आहे. चांदोली (ता. शिराळा, जि. सांगली) धरण परिसरातही रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला.