गुराब, गलबत, पाल या मराठा नौकांचा उलघडला इतिहास, बोन्द्रेनगरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

0
82

फुलेवाडी: विजय बकरे

गुलाब, गलबत, पाल यासह मराठा इतिहासातील नौकांचा इतिहास शिवजयंती निमित्त फुलेवाडी रिंग रोडवरील कारीआई तरुण मंडळाच्यावतीने उलघडण्यात आला. मंडळाच्यावतीने प्रबोधनत्मक शिवजयंती साजरी करत नवा आदर्श घालून दिला आहे. यंदा ‘मराठा स्वराज्याचे आरमार’ हा देखावा करण्यात आला होता. त्याचबरोबर मराठा स्वराज्याचे आरमार हे ऐतिहासिक प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ नागरिक यांच्या वतीने या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिलांची प्रचंड उपस्थिती होती. मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या देखव्यामध्ये मराठा पद्धतीच 60 फुटी जहाज आणण्यात आल आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. मराठा आरमारा विषयीची माहिती देण्यासाठी गौरवशाली मराठा आरमार – 10 जहाज्यांची प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. गुराब, गलबत,पाल, या युद्धनौकासह छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी समुद्रातील उभारणी केलेल्या किल्ल्याची माहिती या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

भारतीय नौदलातील आयएनएस विशाखापट्टणम व आयएनएस विक्रांत या जहाजांच्या प्रतिकृती, भारतामध्ये सर्वात जास्त काळ सत्ता उपभोगणारे युरोपीय म्हणजे पोर्तुगीज होय.या पोर्तुगीज लोकांनी वापरलेले जहाजाच्या प्रतिकृती, भारताच्या अथांग समुद्रात ब्रिटिश आरमाराची अनेक जहाज होती. ती ब्रिटिश जहाज नक्की कशी होती. या प्रदर्शनात ती पाहता आली.

सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमी कुमार गुरव यांच्या मार्फत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

यावेळी अक्षय राणे, सुरेश अर्जुनगी, राहुल जाधव, विजय उर्फ रिंकू देसाई, अनिकेत चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here