
सध्या सर्वांना ‘भूल भूलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाची काहीच दिवसांपुर्वी घोषणा झाली. लॉकडाऊनच्या काळात आलेला कार्तिक आर्यनचा ‘भूल भूलैया 2’ सिनेमा चांगलाच गाजला.
सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. शिवाय कार्तिक – कियाराच्या (Kartik Aryan) जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली. अशातच ‘भूल भूलैया 3’ मध्ये कार्तिक – कियारा (Kiara Advani) पुन्हा झळकणार का, याची सर्वांना उत्सुकता होती. पण ‘भूल भूलैया 3’ बद्दल मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे या सिनेमात कार्तिकसोबत कियारा नाही तर ‘अॅनिमल’ (Animal) फेम भाभी २ झळकणार आहे.
‘भूल भूलैया 3’ च्या टीमने काहीच वेळापुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये एक फोटो देण्यात आलाय. त्यावर लिहिण्यात आलंय की, “हृदयात धडकी भरवणारे हास्य.” असं कॅप्शन देण्यात आलंय. हा फोटो बघताच लोकांनी अभिनेत्रीला लगेच ओळखलं असून ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे तृप्ती डिमरी. तृप्तीला ‘भूल भूलैया 3’ मध्ये कास्ट करण्यासाठी टीम उत्सुक आहे.
