महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आरोग्य सेवक यांचे सामाजिक उत्तरदायित्व सन्मान सोहळा पार पडला

0
448

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे


राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे, कावीळ आजाराचा प्रसार झाला होता, ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य विभागाच्या व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांना यश, हा कावीळ आजार व प्रसार आटोक्यात आणला बद्दल या आरोग्य प्रतिनिधींचे व सरपंच,

सदस्य व स्थानिक नागरिकांचे मा. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले, राधानगरी विधानसभा संघटक नरेंद्र जायले यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व या प्रमाणे काम केल्याबद्दल राधानगरी आरोग्य अधिकारी डॉ आर. आर शेट्टी, ठिकपुर्ली प्राथमिक केंद्राचे मुख्य डॉक्टर अंजू सिंग, डॉ रूपाली गायकवाड, आरोग्य सेवक अधिकारी रवींद्र परीट, नर्स कर्मचारी यांच्या कामाचा गौरव करून त्यांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानपत्र मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज येडूरे यांच्या हस्ते व ठिकपुर्ली गावचे सरपंच प्रल्हाद पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मनसेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण व राहुल कुभार यांच्या उपस्थितीत, कावीळ नियंत्रण योद्धांना कार्याचा सन्मान केला.


यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज येडूरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राहुल कुंभार, सरपंच प्रल्हाद पाटील, दिपक जरगं, सौरभ कांबळे, दयानंद भोईटे, विजय पवार, अमित कोरे, अशोकराव पाटील,डॉक्टर, कर्मचारी, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here