नव मतदार नोंदणी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

0
170

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे


महाराष्ट्र शासन निवडणूक विभाग व शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने 2023 वर्षांमधील निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मत अधिकार लोकशाही त्या संदर्भातील केलेली जागृती नाविन्यपूर्ण उपक्रम नव मतदान नोंदणी व इतर उपक्रमातील उत्कृष्ट सहभाग या संदर्भातील केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

नुकताच शिवाजी विद्यापीठ येथे तसेच राधानगरी महाविद्यालय कॅम्पस ॲम्बेसिडर कुमार गणेश पाटील यांना उत्कृष्ट कॅम्पस अम्बिसिडर पुरस्कार अशा दोघांना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला


यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे शिवाजी विद्यापीठ चे प्रभारी कुलगुरू प्रमोद पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्री चौगुले व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेतील सर्व प्राचार्य समन्वयक नोडल अधिकारी व कॅम्पस अधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here