राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो-किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता टेक्निकल इश्यूमुळे रखडला.

0
155

अभिनंदन भिमराव पुरीबुवा रा चिमगांव ता कागल

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने राज्य सरकार कडून नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जाणार आहेत. जेणेकरून शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी होईल.

मात्र या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना अजून ही मिळालेला नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या अंतिम चाचण्या वेळेत न झाल्यामुळे निधी वाटपाची तारीख रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील जवळपास ८६.६० लाख शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा फायदा मिळणार आहे.

यामध्ये दर चार महिन्यांनंतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये मिळणार आहेत. म्हणजेच वार्षिक ६००० रुपये असेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.वृत्तानुसार, ऑगस्टच्या मध्यावधीच्या आत योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळावा,

अशी इच्छा सरकारची इच्छा होती. पण आधी आर्थिक तरतूद आणि आता टेक्निकल इशूमुळे शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळण्यास उशीर होत आला आहे. महाआयटी याबाबत वेगाने काम करत आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना मदन मिळावी हे सरकारच उद्दीष्ट आहे.राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना ‘नमो-किसान’चा लाभ देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून किमान ६०६० कोटी रुपये द्यावे लागतील. सध्या केवळ ४००० कोटींची तरतूद केलेली आहे. सॉफ्टवेअरच्या चाचण्या पूर्ण झाल्यास सध्याच्या उपलब्ध चार हजार कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरणास अडचण येणार नाही.

तो पर्यंत राज्य शासनाकडून उर्वरित २०६० कोटी रुपये मिळू शकतील. त्यातून तिसरा हप्ता देता येईल, अशी माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here