केंद्र सरकारचा मोठा निर्णय दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार; तर, ११वी, १२वी मध्ये विषय निवडण्याचे स्वातंत्र्य

0
151

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
चिमगांव/ कागल

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता आगामी वर्षा पासून टप्प्यात होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर्ड परीक्षासंदर्भात मोठा बदल करुन तो अमलात आणला जाणार आहे . नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्यावतीने बुधवार, (२३ ऑगस्ट २०२३) ला देण्यात आली.

आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत, आगामी वर्षात बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत.

त्याच बरोबर विद्यार्थ्यांचा ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त त्याच विषयाचे पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.त्याच दरम्यान अकरावी आणि बारावीला दोन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्यामध्ये एका भारतीय भाषेचा समावेश असायला हवा, अशी अट घालण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थी वर्षातून दोन्ही वेळा बोर्डाची परीक्षा देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर मिळणाऱ्या गुणांपैकी सर्वोत्तम गुण यामध्यें ग्राह्य धरले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार , अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यापुढे दोन भाषा येणे सक्तीचे करण्यात आले आहे. शिवाय, त्यापैकी एक भारतीय भाषा असणे गरजेचे आहे, अशी अट घालण्यात आली आहे.शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असून, येत्या शैक्षणिक वर्षासाठी या नियमानुसार शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.

सध्याच्या बोर्डाच्या शैक्षणिक पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भार कमी व्हावा यासाठी हा नवा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शिक्षणाच्या या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मुल्यांकन करता येईल.नव्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा दिल्या जात आहेत, असे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

शिवाय वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असणाऱ्या या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषायाची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देता येणार आहे. निकालानंतर ज्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम गुण मिळाले असतील अशा गुणांचा विचार अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

याशिवाय, अकरावी-बारावीसाठी विषयांची निवड विद्या शाखानिहाय, म्हणजेच कला, विज्ञान आणि वाणिज्य, बायफोकल अशी राहणार नसून कोणत्याही शाखेतील विविध विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विध्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here