भाजपचे लाेकसभा निरीक्षक साेलापुरात दाखल, उमेदवारीबाबत उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेणार

0
141

भाजपचा साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार काेण असावा याबद्दल पदाधिकाऱ्यांची मते जाणून पक्षाचे निरीक्षक मुरलीधर माेहाेळ, आमदार सुधीर गाडगीळ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता साेलापुरात दाखल झाले.

लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा दिवसांत जाहीर हाेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपात साेलापूर लाेकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपकडून लाेकसभेसाठी विद्यमान खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, माळशिरसचे उत्तम जानकर, माजी खासदार अमर साबळे, आमदार राम सातपुते आणि सनदी अधिकारी भारत वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. साेलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जाेर धरू लागली आहे.

दरम्यान, भाजपने इच्छूक उमेदवारांची माहिती जाणून घेण्यासाठी निरीक्षक नेमले आहेत. माढा लाेकसभा मतदारसंघाचे निरीक्षक टेंभुर्णी येथे बैठक घेणार आहेत. साेलापूरची बैठक गुरुवारी दुपारी १२ पासून सुरू झाली आहे. दुपारी दाेन वाजेपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून हे निरीक्षक पुण्याला रवाना हाेणार असल्याचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here