विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

0
149

पती व नणंदेच्या त्रासाला वैतागून एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) परिसरातील येवलेवाडी (Yewalewadi) रोडवरील संभाजीनगर येथे घडली आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पायल प्रविण साळवे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पायलचा भाऊ दिपक संजय गायकवाड (वय-21 रा. वाघळे इस्टेट, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पती प्रविण विठ्ठल साळवे, नणंद मीरा सीरसाठ, मनिषा जाधव यांच्यावर आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण मृत पायल हिचे लग्न प्रविण सोबत झाले आहे.

लग्नानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या बहिणीला वारंवार मानसिक, शारीरिक त्रास दिला. तसेच तिला मारहाण केली.

यामुळे फिर्यादी यांच्या बहिणीने संभाजीनगर, कोंढवा बुद्रुक येथील राहत्या घरात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या

सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here