SP9/कोकरूड प्रतापराव शिंदे
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या माध्यमिक गटात शाहूवाडी तालुकाअंर्तगत स्पधेॅत दत्तसेवा माध्यमिक विद्यालय तुरुकवाडी ता. शाहूवाडी यांनी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.

याबद्दल दत्तसेवा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पाटील व सर्व स्टाफ यांचा सत्कार ठाणे येथील प्रसिद्ध इंजिनिअर डॉ. शिवाजी सावंत, ठाणे महानगरपालिका उपप्रभाग अधिकारी श्रावण शाम तावडे, कॉन्ट्रॅक्टर मनोज वैती, दत्तसेवा समुहाचे संस्थापक आनंदराव माईंगडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थापक आनंदराव माईंगडे म्हणाले की, दत्तसेवा विद्यालयाने विविध उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. आपली शाळा गुणवत्तापूर्ण आणि आदर्श बनविण्यासाठी चांगल्या गोष्टी अंगिकारल्या पाहिजे.
स्पर्धात्मक युगात टाकायचे असलेल्या नवनवीन आव्हाने स्विकारली पाहिजेत. यावेळी तालुकास्तरावरील स्पधेॅतील यशाबद्दल झटलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच अग्निवीर म्हणून निवड झालेला प्रथमेश सुतार याचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी जे. एस. पोतदार, सचिन डॉ. बाळासाहेब पाटील, पतसंस्थेचे विभागिय अधिकारी लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, पत्रकार प्रतापराव शिंदे आदींसह दत्तसेवा विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


