कोल्हापुरात एकाच रस्त्यावर दोन विभागाच्या निधीची उधळण, बांधकाम विभागाचा अट्टाहास

0
162

कोल्हापूर : रस्ते करण्यास एकीकडे निधी मिळत नाही, अशी ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र शहरातील एकच रस्ता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोघेही करणार आहेत. एकाच रस्त्यावर दोन विभागाचा निधी खर्च करणे याला शहाणपणा की मूर्खपणा म्हणावे, असा प्रश्न रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना पडला आहे.

महापालिका प्रशासनाने आम्ही हा रस्ता करणार असल्याचे सांगूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करून तो आम्हीच करणार, असा हट्ट धरला आहे.

करून संभाजीनगर कामगार चाळ ते जरगनगर शेवटचा बस स्टॉप हा रस्ता महापालिका शासन निधीतून करत असल्याचे सांगितले. मात्र त्या अधिकाऱ्यांनी आमचा निधी मंजूर झाला आहे, आता काम कसे थांबविणार, असा उलट प्रश्न केला. तेव्हा शहर हद्दीच्या बाहेरील रस्ता तुम्ही करावा, अशी सूचना घाटगे यांनी केली होती. पण तरीही त्यांचे न ऐकता काम सुरूच ठेवले आहे.

निधी अन्य कामांवर वळविण्यात काय अडचण?

महापालिका चार कोटी ६७ लाख रुपये खर्च करणार आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभाग दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. याचा अर्थ महापालिका करणार असलेला रस्ता अधिक दर्जेदार व टिकाऊ असणार आहेे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला निधी अन्य कामांवर वळविणे आवश्यक आहे. पण त्यांना सांगायचे कोणी, असा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

नाहरकत कुठे आहे..?

शहर हद्दीत बांधकाम विभागाला एखादा रस्ता करायचा असेल तर त्यासाठी महापालिकेचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. त्यावेळी दोन विभागात कसा काय समन्वय झाला नाही, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here