महाशिवरात्र विशेष : महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे, काय खाऊ नये? ५ नियम; पुरेपूर होईल फायदा

0
134

संपूर्ण भारतभरात ८ मार्च २०२४ ला महाशिवरात्रीचा (Maha Shivratri) सण साजरा केला जाणार आहे. (Maha Shivratri 2024) हे पर्व भगवान शिवाच्या उपासकांसाठी खूप महत्वाचे पर्व आहे. (Maha Shivratri Fasting Rules) महाशिवरात्रीचा उपवास करताना काही बेसिक नियम लक्षात घेतले तर तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही आणि पुरेपूर फायदे मिळतील.

महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खाऊ शकतो आणि काय टाळायचं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. या उपवासाचे काही बेसिक सोपे नियम माहीत करून घेऊया. (Maha Shivratri 2024)

१) महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकजण निर्जळी उपवास करतात तर काहीजण या दिवशी फळांचा आहार घेतात. मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता. जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला तर दिवसभर एक थेंबही पाण्याचे सेवन करता येणार नाही.

२) उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या, ताक, फ्रुट्स ज्यूस, मिल्क प्रोडक्ट्स अशा पदार्थांचे सेवन करा, एकवेळचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता. जर तुम्हाला तब्येतीचे कसलेही त्रास असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच उपवास करा अन्यथा उपवास करणं टाळा.

महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खायचं, काय खाऊ नये?

३) महाशिवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ, डाळ, सांध मीठ या पदार्थांचे सेवन टाळा, या व्रताच्या दिवशी तुम्ही सैंधव मीठाचे सेवन करू शकता. या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाकाहार करा. साबुदाण्याची खिचडी, शिंगाड्याचा हलववा, राजगिऱ्याचे पीठ, वरीचा भात, बटाट्याचा हलवा या पदार्थांचे सेवन करू शकता.

४) जर तुम्ही दूध आणि फळांवर उपवास करत असाल तर सफरचंद, केळी, कलिंगड या पदार्थांचा आहारात समावेश करा. उपवास सोडताना जास्त जड पदार्थांचे सेवन करणं टाळा. तुम्ही पचायला हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

५) महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्णवेळ भगवान शिवाचे स्मरण करत राहा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणाच्याही मनाला लागेल असं बोलू नका, वाणी चांगली ठेवा, कोणाचीही निंदा करणं टाळा जेणेकरून या व्रताचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here