कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी उभारलेल्या भव्य मंडपात मुख्यमंत्री उघड्या जीपमधून व्यासपीठाकडे येत होते.
गाडीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने यांच्यासह मान्यवर येत होते.
त्यांची गाडी व्यासपीठाकडे येताना दोन्ही बाजुला खुर्च्यांवर बसलेल्या महिला उठल्या. त्यांना शिंदे अभिवादन करत पुढे जात होते. एवढ्यात एका बाजुला शिंदे यांचे लक्ष गेले. त्या ठिकाणची एक महिला खुर्चीवरून उठताना खाली पडली.
तात्काळ शिंदे गाडीतून खाली उतरले. त्यांनी तिथे जागेवर जावून तुम्हांला काही लागलं का अशी विचारणा केली. अधिकारीही तिकडे धावले. या महिलेने काही लागलं नाही म्हणून सांगितल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा गाडीत चढले. त्यांच्या या संवेदनशीलतेची चर्चा यावेळी सुरू होती.