8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पी. कुमार प्रेजेंट्स आणि एसपी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल मीडिया पार्टनर आयोजित ” सुर तेच छेडीता ” रोमँटिक गीतांचा कार्यक्रम व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न…

0
167

कोल्हापूर येथे दिनांक ८ मार्च 2024 रोजी शाहू स्मारक भवन येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पी. कुमार प्रेजेंट्स आणि एसपी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल मीडिया पार्टनर आयोजित ” सुर तेच छेडीता ” रोमँटिक गीतांचा कार्यक्रम व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात महिला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.तसेच एसपी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्या शुभभहस्तेनारळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रथम गणेश वंदेने कार्यक्रमाचे सुरुवात झाली.त्यानंतर रोमँटिक सदाबहार गाण्याने रसिक जणांना मंत्रमुग्ध केले.रसिक जणांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रशासन मधील काही छंद असणारे गायक यांनीही सूर धरून रसिक जणांना टाळ्यांच्या कडकटामध्ये उत्साही वातावरणामध्ये सदाबहार गाणी सादर केलीत.समाजामध्ये पोलिसांच्या वरील वाढता ताण पाहता.

..त्यातूनच थोडासा राखीव वेळ काढून आपला छंद जोपासताना हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे.त्यांचे कौतुकास्पद काम आहे.त्याचबरोबर गायक कुतुब मुजावर यांनी तर रेणुकादेवीवर खूप चांगल्या पद्धतीने गाणे गायले…त्यांना रसिकजना मधून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला..त्यांनी जे स्टेजवर सादरीकरण केले ते लोकांना खूप भावले..

असे अनेक गायकाने आपले सादरीकरण उत्तम प्रकारे केले.असे उपक्रम प्रत्येक वर्षी पी कुमार स्टुडिओच्या माध्यमातूनहोतच असतात.कुमार हे नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात.यांच्या या कार्याला समाजामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून एसपी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या वतीने गाव -तालुका-जिल्हा पदाधिकाऱ्यांना आयडी, निवड पत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये निवड केलेल्या पदाधिकारी सुनिता हनिमनाळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, रुपम लिगाडे करवीर तालुका अध्यक्ष,वासंती कांबळे कोल्हापूर जिल्हा संघटक, सीमा पाटील रुकडी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष, तेजस्विनी काशीद उपकार्याध्यक्ष, प्रियंका शिर्के पाटील कोल्हापूर कार्याध्यक्ष, राजलक्ष्मी पाटील हातकलंगडे तालुका अध्यक्ष, एडवोकेट माधुरी म्हेत्रे पाटील कोल्हापूर शहर संघटक ,मुनीरा शौकत मुजावर रुकडी महिला संघटक आणि स्नेहल घरपणकर निवेदिका ह्या आहेत.

सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुताई पवार यांनी केले.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील,सौ रोजाना जावेद आंबी,प्राध्यापिका मेघा पाटील संस्थापक अध्यक्ष एसपी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन


सौ सुनिता हनिमनाळे सरोजिनी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष आणि एसपी नाईन मीडिया निर्भया असोशियन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष,शिल्पा पाटील,


एडवोकेट सरिता वसंतराव राजे भोसले,विद्या राजेंद्र इंगवले जेल पोलीस अधिकारी आणि पी कुमार ,त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मीडिया कव्हरेज

घेण्यासाठी सीनियर व्हिडिओ एडिटर तोफिक जमादार ,ग्राफिक डिझायनर सौरभ पाटील,वृत्तसंपादक शुभमराज कोगनोळी आणि स्टुडिओ पदाधिकारी व प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here