घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे दिली माहिती

0
109

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

दिल्ली :महिलादिना निमित्त केंद्र सरकाराने महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.


महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात आम्ही १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच, शिवाय कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here