Kolhapur Politics: महायुतीमधील तीन आमदार नाराज?, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यक्त केली खंत

0
107
Kolhapur Politics: महायुतीमधील तीन आमदार नाराज?, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यक्त केली खंत

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणारे तीन आमदार नाराज असल्याचे समजते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याजवळ या तिन्ही आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार केली आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनन्स इमारतीच्या लोकार्पण समारंभासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील आमदार आणि खासदार कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसांत दोन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात असल्याने शिंदे यांनी दोघांसाठी बळ लावले असताना महायुतीमधील नाराजी समोर आली आहे.

विमानतळाची पाहणी करताना महायुतीला पाठिंबा देणाऱ्या या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करत व्यथा मांडल्या. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापुरातील अपक्ष आमदारांची नाराजी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील तीनपैकी दोन अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त करत आमच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवा, अशी विनंती केली आहे.

चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार

  • भाजपकडून दोन्ही मतदारसंघांवर थेट दावा करताना कोल्हापुरात समरजितसिंह घाटगे आणि हातकणंगलेत ताकदीच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.
  • या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याजवळ या तिन्ही आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार केली.
  • तीनपैकी दोघांनी भाजपला पाठिंबा दिला आहे तर एका आमदाराने शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपला पाठिंबा दिलेल्या दोनपैकी एका आमदाराची भाजपकडून हातकणंगले लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे.
  • त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची वेळ त्यांनी साधली आहे. विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पार पडल्यानंतर त्यातील एका आमदाराने तात्काळ तिथून काढता पाय घेतला.
  • दरम्यान, जागा वाटपावरून खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापुरात काहीही होऊ शकते, आम्ही एका जागेची मागणी केली आहे, असे विधान त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here