आजचे राशिभविष्य, 12 मार्च 2024 : या राशींसाठी व्यवसायात प्रगती, नशिबाची उत्तम साथ मिळणार ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

0
48

Aaj che Rashibhavishya 12 March 2024: प्रत्येक माणूस हा सुखासाठीच काम करत असतो. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समधान मिळू दे हाच उद्देश असतो. या वाटचालीत जर आपल्याला समजले की उद्या काय होणार? तर आपली वाटचाल थोडी का होईना सुखकर होवू शकते. खरंतर भविष्यात काय लिहीलंय ते सांगणे तसे कठिण आहे पण
१२ राशीच्या मदतीने भविष्यात काय होणार याचा अंदाज नक्की व्यक्त करता येतो. म्हणून तर आपण राशिभविष्य वाचत असतो. तुम्हाला जाणून घ्यायचं तुमची राशी काय सांगेत? चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

मेष – कायदेशीर प्रकरणात यश मिळेल

मेष - कायदेशीर प्रकरणात यश मिळेल

मेष राशीच्या लोकांना आज सकारात्मक फळ मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल. तुम्हाला बाहेरील लोकांशी समन्वय राखावा लागेल. कामाच्या ठिकाणी समजुतदारपणाने काम करा, नाहीतर शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. मालमत्तेशी संबंधित एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या नातेवाईकाशी समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या सोबत असेल. योगसाधना प्राणायाम करा.

वृषभ – शुभ कार्यात सहभागी व्हाल

वृषभ - शुभ कार्यात सहभागी व्हाल

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या लग्नाबाबत काही समस्या निर्माण झाल्या असतील तर आज त्या दूर होऊन लग्नाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत होते त्यांचीही इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आज कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारीही तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमची काही रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा

मिथुन – पैशांचे व्यवहार करताना सावधान

मिथुन – पैशांचे व्यवहार करताना सावधान

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. जर तुम्ही याआधी कोणाकडून पैसे घेतले असतील, तर ते फेडण्यात तुम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांची बदली झाल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. आज कोणाशी पैशांचे व्यवहार करताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. नाहीतर परस्पर संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. मार्केटिंगशी संबंधित लोक काही चांगले काम सुरू करू शकतात. व्यावसायिकांना काही अडचणी येत असतील तर त्यातून दिलासा मिळेल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या सोबत असेल. गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा.

कर्क – पैशांची मदत कराल

कर्क – पैशांची मदत कराल

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा दिवस असेल. वडीलधाऱ्या मंडळींच्या मदतीने तुम्हाला तुमच्या भावंडांसोबतच्या नात्यातील कटुता दूर करावी लागेल. व्यावसायिकांसाठी दिवस संमिश्र राहील. तुमचे कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, तरच ते ध्येय साध्य होईल. आज जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला पैशाशी संबंधित मदत मागितली तर तुम्ही ती पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी काही नवीन शिकायला मिळेल. तुमची एखादी आवडती वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या सोबत असेल. माता सरस्वतीची पूजा करा.

सिंह – मुलांचे हट्ट पुरवावे लागतील

सिंह – मुलांचे हट्ट पुरवावे लागतील

आज सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रेम जीवनातील लोक आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखू शकतात. तुमची काही गुपिते आज तुमच्या कुटुंबियांसमोर उघड होऊ शकतात. तुमची मुलं तुमच्याकडून एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करू शकतात. ते तुम्हाला पुरवावे लागतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. सिंह राशीचे लोक या आठवड्यात व्यवसायात सक्रिय सहभाग घेतील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला जुन्या मित्र किंवा मैत्रिणीला भेटण्याची संधी मिळेल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या सोबत असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे रोज पठण करा.

कन्या – निराशाजनक माहिती मिळेल

कन्या - निराशाजनक माहिती मिळेल

आज कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून काही निराशाजनक माहिती मिळेल. जर तुम्ही व्यवसायासाठी काही नवीन योजना आखल्या असतील तर तुम्ही त्या आज सुरू करू शकता. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील, तरच त्यांना यश संपादन करता येईल. तुमचं तुमच्या आईशी काही कारणावरून भांडण होऊ शकते. आज कोणालाही पैसे उधार देणे टाळावे लागेल, नाहीतर तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या सोबत असेल. शनिदेवाचे दर्शन घ्या आणि तेल अर्पण करा.

तूळ – मुलांच्या करिअरची चिंता मिटेल

तूळ – मुलांच्या करिअरची चिंता मिटेल

आज तूळ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाला जात असाल तर आई-वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल बराच काळ चिंतेत होता, तर आज ती चिंताही मिटेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. काही प्रकरणांबाबत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी समेट करू शकता.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या सोबत असेल. श्वेत रेशमी वस्त्राचे दान करा

वृश्चिक – निर्णयक्षमतेचा फायदा होईल

वृश्चिक - निर्णयक्षमतेचा फायदा होईल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. साध्य सुरू असलेल्या काही योजनांवर तुम्हाला तुमचे लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुम्ही त्या पूर्ण करू शकाल. तुमच्या निर्णयक्षमतेचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. तुमच्या कामासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळाल्याने तुमचा आदर वाढेल. परंतु कोणाच्याही बोलण्याला फसू नका. नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी तुम्हाला काही लोकांशी सुसंवाद साधावा लागेल. काही नवीन लोक भेटले तर त्यांना तुमच्या भावना न सांगणे श्रेयस्कर ठरेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या सोबत असेल. चंदनाचा टिळा लावा.

धनू – उर्जा वाया घालवू नका

धनू – उर्जा वाया घालवू नका

आजचा दिवस धनू राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा आहे. तुमच्या योजना सुरू करण्यापूर्वी तुम्ही अनुभवी व्यक्तीशी बोलणे आवश्यक आहे. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला संयम बाळगावा लागेल. तुमच्यात खूप ऊर्जा असल्याने ती वायफळ कामांमध्ये वाया घालवू नका. व्यावसायाशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत कराल. जे लोक प्रवासाला जाण्याचा बेत आखत असतील त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतील याची खात्री करून घेतली पाहिजे.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या सोबत असेल. भुकेलेल्यास अन्न खाऊ घाला.

मकर – इतरांकडून अपेक्षा ठेऊ नका

मकर - इतरांकडून अपेक्षा ठेऊ नका

मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामासाठी इतरांकडून जास्त अपेक्षा ठेऊ नका, यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास असेल. व्यवसाय करणारे लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात. तुमच्या मुलांशी काही मुद्द्यांवर खटके उडू शकतात, अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांच्याशी खूप विचारपूर्वक संवाद साधावा लागेल. जर तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक केली तर त्यात तुमच्या पदरी निराशा पडू शकते.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या सोबत असेल. ब्राम्हणाला दान करा

कुंभ – दिखाऊपणासाठी जास्त पैसे खर्च कराल

कुंभ - दिखाऊपणासाठी जास्त पैसे खर्च कराल

कुंभ राशीचे लोक आज खूप व्यग्र राहणार आहेत. जर तुम्ही प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करत असाल तर तुम्ही एखादा मोठा करार पूर्ण कराल. एकाच वेळी अनेक कामे हाताशी असल्याने तुमची चिंता वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला कोणते काम आधी करावे आणि कोणते नंतर करावे हे समजणार नाही. तुम्ही दिखाऊपणा करण्यासाठी जास्त पैसे खर्च करू शकता, त्यानंतर तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तुमच्या मेहनतीला आज फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्यांचे ओझे असेल तर तुम्ही त्याला घाबरून जाऊ नका.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूच्या माळेचा १०८ वेळा जप करा.

मीन – व्यवसायातील समस्या दूर होतील

मीन – व्यवसायातील समस्या दूर होतील

मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आज गोडवा येणार आहे. आज तुम्हाला असे काही खास लोक भेटतील, ज्यांच्याशी बोलताना तुम्ही तुमची काही गुपिते उघड न केलेली बरी. जर तुम्हाला काही काळापासून व्यवसायात येत असलेल्या एखाद्या समस्येमुळे तुम्हाला ताण जाणवत असेल, तर ती देखील आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. खूप दिवसांनी एखादा मित्र अथवा मैत्रीण भेटल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यासाठी काही योजना बनवू शकता. तुम्ही कसलाही अहंकार बगाळू नये.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या सोबत असेल. माता पार्वती किंवा उमेची पूजा करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here