‘शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी’, जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूं’ सिनेमा

0
61
'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी', जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा

बॉलिवूडमधील अनुभवी कलाकारांपैकी एक असलेल्या पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूं’ हा सिनेमा जानेवारीमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली होती.

चित्रपटातील अभिनय पाहून समीक्षकांनी अभिनेत्याचं खूप कौतुक केलं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट लवकरच OTT वर येणार आहे. या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांचा कवी ते राजकारणी असा प्रवास खूप छान दाखवण्यात आला आहे.

या सिनेमात पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त पियुष मिश्रा, राजा सेवक, दया शंकर पांडे आणि एकता कौल यांच्यासह अनेक कलाकार दिसले होते.

आता हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर येतोय. Zee5 ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची घोषणा करणारे पोस्टर शेअर केले आहे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी, ‘मैं अटल हूं’चा प्रीमियर १४ मार्च रोजी फक्त ZEE5 वर होईल’. ‘मैं अटल हूं’ सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रतिभावंत नेत्याचा जीवनप्रवास रंजक पद्धतीने मांडण्याचा उत्तम प्रयत्न ‘मैं अटल हूँ’ चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here