सन्मानी फुड फेस्टिव्हलला कोल्हापूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

0
127

कोल्हापूर/ प्रतापराव शिंदे

जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानी प्रस्तुत शाॅंपिग फुड फेस्टिव्हल आणि फन २०२४ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ९ व १० मार्च रोजी बालाजी गार्डन नागाळ पार्क कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला.

प्रारंभी ९ मार्च रोजी सकाळी भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापिका अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उभारण्यात आलेल्या सर्व स्टाॅलला अरूंधती महाडिक यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान सायंकाळी राज्य राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक सदानंद सदानंशिव, दत्तसेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आनंदराव माईंगडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यवाह प्रतापराव शिंदे, दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक डॉ. सुरेश राठोड, दत्तशिक्षण


प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. बाळासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी जे. एस. पोतदार आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन सन्मानी ग्रुपला शुभेच्छा दिल्या. या फुड फेस्टिव्हल मध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर येथील उद्योजकांनी स्टाॅल मांडले होते.

याला कोल्हापूर परिसरातील लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या फुड फेस्टिव्हलचे नेटके संयोजन समर्थ कुकींग क्लासेसच्या संजोत दप्तरदार, सखी एझ्जीपिशनच्या
अध्यायनी पोरे , मंदेव इव्हेंटच्या मंजिरी देवाणावर आदी महिला पदाधिकाऱ्यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here