वाटाणा, फरसबी, टोमॅटोच्या महागाईचा पारा उतरला; कोथिंबीर, ढोबळी मिरचीची तेजी सुरूच

0
73
वाटाणा, फरसबी, टोमॅटोच्या महागाईचा पारा उतरला; कोथिंबीर, ढोबळी मिरचीची तेजी सुरूच

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी तीन हजार टन भाजीपाल्यांची आवक झाली. आवक वाढल्याने वाटाणा, फरसबी, टोमॅटोसह बहुतांश भाज्यांचे दर घसरले आहेत. ढोबळी मिर्ची व कोथिंबीरचे दर मात्र अद्याप तेजीत आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यांतून सोमवारी दिवसभरात ६४१ वाहनांमधून भाजीपाला बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आला. यामध्ये ३ हजार टन फळ भाज्या व ४ लाख ७७ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे भाव चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषिमाल मुंबईमध्ये पाठविला. पण आवक वाढल्यामुळे बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली.

उष्णता वाढताच पुन्हा दरवाढ :

१) आवळा, बीट, भेंडी, फरसबी, फ्लॉवर, गाजर, घेवडा, कैरी, कारली, कोबी, शेवगा शेंग, दोडका, टोमॅटो, तोंडली, वाटाणा, वांगी, कांदापात व पालकच्या दरामध्ये घसरण झाली आहे.

२) बहुतांश सर्व भाज्यांचे दर कमी झालेले असताना या आठवड्यात ढोबळी मिर्ची, दुधी भोपळा, कोथिंबीर व मेथीच्या दरामध्ये मात्र वाढ झाली. यापुढे उन्हाची तीव्रता जशी वाढेल तशी बाजारभावामध्येही तेजी येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

पालेज्यांचे प्रतिजुडी दर :

कांदापात ८ ते १२ ६ ते ८
कोथिंबीर ८ ते १२ १० ते १५
मेथी ७ ते १० १० ते १५
पालक ८ ते १२ ६ ते ७

आठवड्यातील भाजीपाल्याचे प्रतिकिलो बाजारभाव –

भाजी ४ मार्च ११ मार्च
आवळा २५ ते ३५ २० ते ३०
बीट २० ते ३५ १६ ते २०
भेंडी १५ ते ४० २४ ते ३४
फरसबी २५ ते ३५ २२ ते २८
फ्लॉवर १५ ते २५ ८ ते १२
गाजर २० ते ३५ १२ ते १६
घेवडा २८ ते ४८ २४ ते ३०
कैरी ४ ५ ते ६५ ४० ते ५०
कारली २५ ते ४० २८ ते ३४
कोबी १० ते २५ १२ ते २०
ढोबळी मिर्ची ३० ते ५० ४० ते ६०
शेवगा शेंग ४० ते ७० ३५ ते ४५
दोडका २० ते ५० ३२ ते ३८
टोमॅटो १० ते २५ १० ते १४
तोंडली २० ते ५५ ३२ ते ५०
वाटाणा ३० ते ५० ३२ ते ४०
वांगी २० ते ३५ १६ ते ३०
दुधी भोपळा २५ ते ३५ ३० ते ३६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here