Astro Tips: विवाहात विलंब होत असेल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा; लाभ होईल!

0
110
Astro Tips: विवाहात विलंब होत असेल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा; लाभ होईल!

आज फुलेरा दूज आहे. फुलोरा दुज या शब्दावरूनच उत्सवाचे स्वरूप लक्षात येते. हादेखील होळीचाच एक प्रकार असून ही होळी फुलांनी खेळली जाते आणि राधा कृष्ण हे त्या उत्सवाचे मुख्य दैवत असते.

सनातन धर्मात, फुलेरा द्विज हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांना समर्पित आहे. हा उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी असतो. या विशेष प्रसंगी फुलांची होळी खेळण्याचे विशेष महत्त्व आहे. आता अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर असे काही उपाय आहेत, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनातील तसेच विवाह ठरण्यातील अडथळे दूर होऊ शकतात. ते उपाय जाणून घेऊया. तत्पूर्वी या उत्सवामागील पौराणिक कथा जाणून घ्या!

पौराणिक कथा:

फुलेरा दुज सणामागची कथा : राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे दाखले आजही दिले जातात. कृष्णाचा विवाह रुख्मिणी, सत्यभामाशी होऊनसुद्धा कृष्णाचा आठव करताना राधाकृष्ण हेच नाव आपल्या ओठी येते. एवढे त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या प्रेमात शारीरिक नाही आंतरिक ओढ होती. याच ओढीमुळे एकदा राधा कृष्णावर रागावली. कारण अनेक दिवसात त्यांची परस्परांशी भेट झाली नव्हती. राधेने अनेकदा कृष्णाला साद घातली, परंतु मथुरेच्या व्यापात अडकलेल्या कृष्णाला येणे जमत नव्हते.

राधा हिरमुसली. कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झाली. तिची अवस्था पाहून गोप गोपिकासुद्धा श्रीकृष्णावर रागावलया. एवढेच काय, तर वृन्दावनातल्या लता,
वेलीसुद्धा कोमेजून गेल्या. ही वार्ता मथुरेत कृष्णाला कळली. कृष्णाला राहवेना. त्याने येतो, असा निरोप धाडला. कृष्ण येणार हे कळताच वृंदावनातले वातावरण आनंदून गेले.

कृष्ण वृंदावनी आला. त्याने राधेची भेट घेतली आणि तिला नुकतेच उमललेले एक सुंदर फुल भेट म्हणून दिले. राधेनेही कृष्णाला छानसे फुल भेट म्हणून दिले. त्या दोघांचा परस्परांना पाहून झालेला आनंद पाहता साऱ्या सृष्टीने दोघांवर पुष्प वृष्टी केली. त्या भेटीनंतर कृष्ण होळी, रंगपंचमी झाल्यावर मथुरेत परतला. तेव्हापासून फाल्गुन द्वितीयेच्या दिवशी फुलेरा दुज हा उत्सव मथुरा आणि वृंदावनात साजरा केला जातो.

हा सण वसंत ऋतूशी जोडलेला आहे. वसंतात उमलणाऱ्या विविध फुलांशी आपला परिचय व्हावा, निसर्गाशी जवळीक साधता यावी आणि दाम्पत्यांमध्ये प्रेम संबंध अधिक घट्ट व्हावेत, हा या सणामागील मुख्य उद्देश आहे. आजच्या काळाशी या सणाचा संबंध जोडायचा ठरवला, तर रंगपंचमीच्या दिवशी केमिकल रंगांनी होळी न खेळता, नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी, हा संदेश या सणातून घेता येऊ शकतो.

आता पाहूया लग्नाविषयी उपाय :

राधा कृष्ण हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरा बायकोच्या नात्यात तसेच प्रेम, जिव्हाळा, स्नेह असावा असे वाटत असेल तर आज फुलोरा दुजच्या मुहूर्तावर राधा कृष्णाशी संबंधित दिलेले उपाय करा. जेणेकरून तुमच्याही नात्यात गोडवा वाढेल आणि ज्यांचा जोडीदार मिळण्यासाठी शोध सुरु आहे त्यांनाही या उपायांचा लाभ होईल.

>> जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचे असेल तर फुलेरा दूजच्या दिवशी एक पांढरा कागद घ्या आणि त्यावर त्या व्यक्तीचे नाव कुंकवाने लिहा. नंतर तो कागद राधा-कृष्णाच्या चरणी अर्पण करा. तसे केले असता तुमच्यातील नाते सुधारते आणि दृढ होऊन चांगले संबंध प्रस्थापित होतात.

>> जर तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या येत असेल. जर तुमचे काम पूर्ण होत असताना बिघडले तर फुलेरा दूजच्या दिवशी राधा-कृष्णाची पूजा करून त्यांना फुलांनी सजवा. आपल्या अडचणी देवाला सांगून त्या दूर करण्यासंबंधी भक्तिभावाने प्रार्थना करा, निश्चितच लाभ होईल.

>> जीवनातील प्रगतीसाठी भगवान श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र अर्पण करा. यामुळे सौभाग्य वाढते आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here