कारागृह उप महानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे यांचे शुभ हस्ते कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या कार वॉशिंग सेंटरच्या कोनशील चे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.
सदर कार वॉशिंग सेंटर मध्ये कोल्हापूर वासियांसाठी स्थानिक खाजगी वॉशिंग सेंटरच्या दरापेक्षा तुलनेने कमी दरामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच कारागृहतसेच कारागृहनिर्मित वस्तूंच्या विक्रीकरिता सुसज्ज विक्री केंद्र इमारत बांधकाम कारागृहातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचे साठी चेंजिंग रूम रेस्ट हाऊस इमारत बांधकाम कारागृहाचे मुख्य तट भिंतीच्या बाहेरील बाजूने सिमेंट रस्ता मुख्यत भिंतीच्या आतील बाजूने डांबरीकरण रस्ता मुख्यत भिंतीवर चेनीलिंग फिनिशिंग व मुख्य तट भिंत दुरुस्ती इत्यादी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
माननीय श्री अमिताभ गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे, डॉक्टर जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक, श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमा निरीक्षक पश्चिम विभाग येरवडा पुणे यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन याप्रमाणे कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंदी सुधारणा व पुनर्वसनासाठी सुतार काम लोहार काम शिवणकाम यंत्रमाग बेकरी विभाग व करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई लाडू प्रसाद अशा विविध प्रकारचे बंद्यानमार्फत उपक्रम राबवले जातात.
यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कार वॉशिंग सेंटरचा समावेश करण्यात आला आहे.सदर कार वॉशिंग सेंटर तसेच महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निधी व जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर यांचे कडून प्राप्त निधी मधून करण्यात येणाऱ्या विविध कामाचे माननीय श्रीमती स्वाती साठे कारागृह उप महानिरीक्षक यांचे शुभ हस्ते व संजय पाटील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणून श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमा निरीक्षक पश्चिम विभाग येरवडा पुणे व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संजय पाटील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर उपस्थित होते.तसेच सदर कार्यक्रमासाठी माननीय श्री पांडुरंग भुसारे कारागृह अधीक्षक, श्री साहेबराव आडे उपअधीक्षक, प्रशासन अधिकारी श्री अरुण ढेरे , वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री चंद्रशेखरदेवकर, श्री सतीश कदम, श्री सोमनाथ मस्के व श्रीमती एस एस वाघ, बांधकाम तुरुंग अधिकारी श्री विठ्ठल शिंदे तसेच इतर सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.