खोची
येथील डी.एस.पाटील यांना कविता व साहित्यिक क्षेत्र,शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा विचार करुन इचलकरंजी येथील श्रावस्ती सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री चिन्मयी सुमित,शिव व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी,अध्यक्षा भक्ती शिंदे,सारिका पुजेरी यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात कार्यक्रम पार पडला.
दिनकर श्रीपती पाटील यांनी नाधवडे हायस्कूल सिंधुदुर्ग जिल्हा येथे ३२ वर्षे शिक्षक,२ वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आहे.विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत.
त्यांना आजवर भारत सरकारचा नेहरु युवा पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,केसरकर शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्र पुरस्कार,ज्ञानदीप पुरस्कार,पेंढारकर शिक्षक पुरस्कार,रोटरी पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार,कोकणसाद चे दीपस्तंभ सन्मानपत्र,गुरुगौरव पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार,संकेत पुरस्कार,कला गौरव पुरस्कार आदी ३५ हून अधिक पुरस्कार,८० हून अधिक सन्मानचिन्हांनी गौरविण्यात आले आहे.
डी.एस.पाटील यांनी ४ हजार हून अधिक कविता व चारोळी लिहिल्या आहेत.२ हजार हून अधिक सुविचार लिहिले आहेत.४ हून अधिक वाचकांची पत्रे विविध दैनिकं, साप्ताहिक व मासिकात प्रसिद्ध झाली आहेत.
विविध विषयांवर २०० हून अधिक व्याख्यानं दिली आहेत.विविध वृत्तपत्रात प्रासंगिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.योगा व प्राणायामची ३०० हून अधिक शिबिरं घेतली आहेत.१५० हून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.एक अष्टपैलू,सेवाभावी व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून डी.एस.पाटील यांची ख्याती आहे.