आजचे राशिभविष्य, 15 मार्च 2024 : या राशींच्या कौटुंबिक सुखात वाढ, सुखाची साधने वाढणार ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

0
185

Aaj che Rashibhavishya 15 March 2024: येत्या काळात आपल्या आयुष्यात काय चांगलं किंवा वाईट होईल हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. जन्मकुंडलीद्वारे आपल्याला भविष्यात येणाऱ्या काही गोष्टींविषयी कल्पना मिळते. ही भाकीतं प्रत्येक राशीप्रमाणे सांगतली जातात. आपलं नशीब आणि आपलं भविष्य आपल्याला साथ कशी देईल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली असते. आजचा हा दिवस ज्याोतिषशास्त्रानुसार आपल्यासाठी कसा असेल जाणून घेवूया. मेष ते मीन राशीपर्यंत आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

मेष – कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल

मेष - कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि काही कामाबद्दल चिंतेत असाल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या भावांची मदत घेऊ शकता. राजकारणात काम करणारे लोक आज लोकांशी संपर्क साधून त्यांना जोडण्यात यशस्वी होतील. आज तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून हवी असलेली एखादी नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही पूर्वी केलेल्या चुकांमधून काही धडा घेतला नसेल तर आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारले जाऊ शकते.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या सोबत असेल. माता लक्ष्मीची पूजा करा.

वृषभ – अनोळखी व्यक्ती भेटतील

वृषभ - अनोळखी व्यक्ती भेटतील

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावध राहा. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांवर नाराज होऊ शकता. त्यांनी दिलेले काम तुम्ही वेळेवर पूर्ण करा. जर तुम्ही तुमचे विचार बाहेरच्या व्यक्तीला सांगितले तर तो नंतर तुमची चेष्टा करू शकतो. कोणतेही काम नशिबावर सोडू नका. आज काही अनोळखी व्यक्ती भेटतील. आज तुमची इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या सोबत असेल. पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा.

मिथुन – आरोग्याबाबत जागरूक राहा

मिथुन - आरोग्याबाबत जागरूक राहा

मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणतेही निर्णय घाईगडबडीत आणि भावनिक होऊन घेऊ नयेत. तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल. कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार आणि चालीरीती शिकवण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही निष्काळजीपणा करू नका. काही कौटुंबिक वाद असतील तर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून ते सोडवल्यास तुमच्यासाठी इष्ट राहील. व्यवसायाशी संबंधित काही कामांसाठी तुम्ही जवळच्या प्रवासाला जाऊ शकता. अचानक धन मिळाल्याने मन प्रसन्न राहील.
आज भाग्य ९६ टक्के तुमच्या सोबत असेल. लक्ष्मीदेवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा.

कर्क – जबा​बदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा

कर्क – जबा​बदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा

आज कर्क राशीचे लोक एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादी जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करणार असाल तर त्याचे सर्व पैलू स्वतंत्रपणे तपासा. भागीदारीत एखादे काम करण्यात तुम्ही पूर्ण रुची दाखवाल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आज दूर होतील, ज्यामुळे तुम्ही दोघे एकमेकांचे म्हणणे ऐकून आणि समजून घ्याल. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या सोबत असेल. गुरुजन किंवा वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या.

सिंह – कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका

सिंह - कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेची तयारी पूर्ण मेहनत आणि समर्पणाने करतील. नोकरदार लोक त्यांच्या कामाने त्यांच्या वरिष्ठांना खुश करतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. तुम्ही पूर्वी केलेल्या चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल. कोणाच्या बोलण्याने फसू नका. तुमच्या आईच्या काही शारीरिक समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल, ज्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या सोबत असेल. गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा.

कन्या – अध्यात्मात रुची वाटेल

कन्या - अध्यात्मात रुची वाटेल

कन्या राशीच्या लोकांना आज अभ्यास आणि अध्यात्मात रुची वाटू लागेल. जर तुम्ही पैशाशी संबंधित एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर ती तुमच्या मित्राच्या मदतीने सुटेल. मित्रांसोबत पार्टी करण्याची योजना आखू शकता. तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून व्यवसायाशी संबंधित एखादी मदत घेऊ शकता. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून रखडलेले असेल तर तेही पूर्ण होईल असे वाटते. वैयक्तिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, नाहीतर कोणीतरी तुमची दिशाभूल करू शकतं.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या सोबत असेल. शिव चालिसाचे पठण करा.

तूळ – कौटुंबिक सुखाची साधने वाढतील

तूळ - कौटुंबिक सुखाची साधने वाढतील

आज तूळ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. तुमच्या एखाद्या मित्राच्या बोलण्यामुळे तुम्ही भांडण ओढवून घेऊ शकता. याचा तुम्हाला त्रास होईल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही खूप सक्रीय असाल. तुमची कौटुंबिक सुखाची साधनेही वाढतील. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करू शकता. तुमचे उत्पन्न वाढल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ घालवाल. त्यांच्याशी तुम्ही काही महत्त्वाच्या कामांविषयी चर्चा कराल. मुलांच्या एखाद्या परीक्षेच्या चांगल्या निकालामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या सोबत असेल. माता सरस्वतीची पूजा करा.

वृश्चिक – नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील

वृश्चिक - नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील

वृश्चिक राशीचे लोक आज लोककल्याणाच्या कामात सहभागी होऊन नाव कमावतील. सामाजिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. नफा मिळवण्याच्या नादात एखादा मोठा फायदा हातातून निसटणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. काही नवीन लोकांच्या गाठीभेटी घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज बंधुभावाची भावना वाढेल. आज तुम्ही काही कामात व्यग्र असाल. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या सोबत असेल. श्वेत वस्तूचे दान करा.

धनू – रखडलेले काम पूर्ण होईल

धनू - रखडलेले काम पूर्ण होईल

आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस धनू राशीच्या लोकांसाठी तुमच्या संपत्तीत वाढ होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल, पण ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घ्याल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे एखादे रखडलेले काम सहज पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही नवीन काम सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या सोबत असेल. पिवळ्या वस्तूचे दान करा.

मकर – खर्च वाढेल

मकर – खर्च वाढेल

मकर राशीचे लोक आज व्यवसायात काही दीर्घकालीन योजना सुरू करू शकतात. तुमच्या बोलण्यातला सौम्यपणामुळे तुम्हाला सर्वांकडून आदर मिळेल. सर्जनशील कार्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या आईला तुमच्या सासरच्या मंडळींना भेटायला घेऊन जाऊ शकता. आज तुमच्या सुख-समृद्धीसोबतच तुमचा खर्चही वाढू शकतो.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या सोबत असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

कुंभ – देण्याघेण्याचे व्यवहार काळजीपूर्वक करा

कुंभ – देण्याघेण्याचे व्यवहार काळजीपूर्वक करा

आज कुंभ राशीच्या लोकांना खूप खर्च करावा लागणार आहे. तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या चांगल्या विचारांचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. आर्थिक बाबतीत घाईगडबड करू नका, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुम्ही उगीच दिखाव्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता अये. कोणताही देण्याघेण्याचा व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या सोबत असेल. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या.

मीन – एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न मिळेल

मीन - एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न मिळेल

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला असणार आहे कामाच्या ठिकाणीही तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न मिळेल. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायलाही मिळेल. तुमचे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. तुमची काही रखडलेली कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकलात तर तुम्हाला त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो. कोणत्याही कामात न डगमगता पुढे गेल्यास तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या सोबत असेल. गोमातेस हिरवा चारा खाऊ घाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here