लोकसभेचं बिगुल वाजणार! उद्या निवडणूक आयोग मोठी घोषणा करणार, आचारसंहिता लागणार

0
189

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे.

सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. २०१९ मध्ये, सार्वत्रिक निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत पार पडल्या आणि २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here