“फक्त उर भरून येतो..”; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक

0
169
"फक्त उर भरून येतो.."; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. केवळ भारतात नव्हे तर जगभरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चे चाहते आहेत. हास्यजत्रातील अनेक कलाकारांना त्यांचे फॅन्स भरभरुन प्रेम करत असतात.

नुकताच समीर चौगुलेंना त्यांच्या फॅन्सचा हा भन्नाट अनुभव आला. समीर यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना ही खास गोष्ट सांगितली.

समीर चौगुलेंनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत एक माणूस वगळता सर्वांनी समीर यांचे मास्क चेहऱ्यावर लावले आहेत. हा फोटो पोस्ट करुन समीर लिहीतात, “असे प्रेम करणारे Fans हीच माझी कमाई… माझ्या एका चाहत्याचा दीप डाबरे याचा काल वाढदिवस होता..

त्याच्या मित्र मैत्रिणींनी माझ्या चेहेऱ्याचा मास्क घालून त्याला सरप्राइज दिलं…अश्या वेळी काय बोलावं कळत नाही हो…फक्त उर भरून येतो….. दीप ….happy birthday my dear…thank you for loving me so much…..lots of love to all of you…खूप प्रेम तुम्हा सर्वांना….thank you वनराई for letting me know this.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here