मंडलिक गटाचा कोल्हापूरात मेळावा; उमेदवारी न मिळाल्यास महायुतीत बंडखोरीची शक्यता

0
150
मंडलिक गटाचा कोल्हापूरात मेळावा; उमेदवारी न मिळाल्यास महायुतीत बंडखोरीची शक्यता

कोल्हापूर : शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा थोड्याच वेळात येथील दैवज्ञ बोर्डिंग मध्ये होणार आहे. एकीकडे कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नसताना आणि संजय मंडलिक यांच्या ऐवजी भाजपचे समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा दुपारी ४ वाजता होणार हा मेळावा लक्षवेधी ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नव्हती. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार यांच्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना मंडलिक गटाने मात्र मेळावा आयोजित केल्याने चर्चेला ऊत आला आहे. जर उमेदवारी नाहीच मिळाली तर बंडखोरीच्या पवित्र्यात मंडलिक दिसणार का असा प्रश्न जिल्हाभर उपस्थित केला जात आहे. मंडलिक मात्र स्वतःच्या उमेदवारीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतानाच माझ्या उमेदवारीचा निर्णय झालेला आहे असा विश्वास त्यांना असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here