कॉलेज ऑफ नॉन कॉन्व्हेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन यांच्यावतीने नेचर क्लब दिवस साजरा करण्यात आला

0
133

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

शाश्वत विकासासाठी: पर्यावरणपूरक राखी
दिनांक २६ऑगस्ट २०२३ रोजी पर्यावरणशास्त्र विभाग, कॉलेज ऑफ नॉन कॉन्व्हेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन यांच्यावतीने नेचर क्लब दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्त विद्यार्थिनींनी बनवलेल्या पर्यावरणपूरक राखीचे प्रदर्शन मांडण्यात आले. पर्यावरणपूरक राखींची निर्मिती हि वेगवेगळ्या बियाणं पासून कार्यांत आली आहे. याच सोबत विद्यार्थिनींनी भित्ती पत्रक आणि मॉडेल याचे हि प्रदर्शन सादर केले या निमित्त प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, यांनी विद्याथिनींना मार्गदर्शन केले.

नेचर क्लब कार्यक्रम अधिकारी प्रा. पूजा सरोळकर यांच्या अध्येक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

सर्व विभाग प्रमुख, व नेचर क्लब कार्यक्रम अधिकारी, सदस्य, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली . या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.आर. ए. शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here