
प्रतिनिधी:मेघापाटील
शॉर्टगन ट्रॅप व डबल ट्रॅप स्पर्धा नुकतीच बालेवाडी, पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर सह गोव्यातील स्पर्धक देखिल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेत डबल ट्रॅव्हल इव्हेंटमध्ये अब्दुलहमीद शाहाजान मिरशिकारी ऊर्फ लालूभाई यांनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रात तिसरा तर ट्रॅप इव्हेंट मध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक पटकावला.
लालूभाई हे जेबीके शूटिंग फाउंडेशन मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय रायफल शूटर तेजस रमेश कुसाळे सर, रमेश जयसिंग कुसाळे सर, स्नेहा रमेश कुसाळे मॅडम, कल्पना कुसाळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. लालूभाई यांनी राज्यस्तरीय शॉटगन स्पर्धेत अव्वल गुण प्राप्त केल्याने त्यांची पुर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

