‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील हा चित्रपट २६ एप्रिलला

0
206

प्रतिनिधी मेघा पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी आहेत.
शिवाजी दोलताडे दिग्दर्शक असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून , सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. डॉ.सुधीर निकम यांचे संवाद आणि पटकथा आहे.

चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here