सौ ऋजुता देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवा सहयोग फाउंडेशन संचलित जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न…

0
185

ठाणे: अनमोल विद्यामंदिर शाळा स्वामी विवेकानंद नगर ठाणे येथे सेवा सहयोग फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारीशक्तीचा हा कार्यक्रम मोठ्या दिमाखातत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून सौ ऋजुता देशपांडे ह्या उपस्थित होत्या.सौ ऋजुता देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांचा सन्मान ही करण्यात आला.सौ ऋजुता देशपांडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांमध्ये अनेक कष्टकरी महिला युवा विद्यार्थिनी ही उपस्थित होत्या.सेवा सहयोग फाउंडेशन हे सतत अनेक उपक्रम राबवत असतात.हे फाउंडेशन अभ्यासिकेत स्वयंसेवक विद्यार्थ्यांना अनेक विषय शिकवतात व परीक्षेच्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करतात.त्याचबरोबर मनकर्णिका किशोरी वर्गामध्ये वयात आलेल्या मुलींनाही योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते.

असे अनेक सामाजिक उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे राबवले जातात.या कार्यक्रमा वेळी भारत विकास परिषदेच्या साधनाताईजोशी व सेवा सहयोग फाउंडेशनव सेवा सहयोग फाउंडेशन च्या अनिता पाटेकर व फाउंडेशनच्या पदाधिकारी सभासद सदस्य महिला उपस्थित होत्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here