
प्रतिनिधी मेघा पाटील
मिरज: शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगली संचलित विश्वेश्वरेय्या टेक्निकल कॅम्पस पाडगाव मिरज “उमंग 2024” आयोजन करण्यात आले आहे.सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण आणि माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 23 मार्च 2024 रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.हा कार्यक्रम खुले सभागृह विश्वेश्वरेय्या टेक्निकल कॅम्पस पाडगाव मिरज मिरज पंढरपूर हायवे येते आयोजित केला आहे.या उमंग 2024 कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील यशवंत, गुणवंत आणि कलावंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा कलाविष्कार सादर करण्यात येणार आहे.त्याचबरोबर गुणगौरवाचा ही कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठीडॉक्टर इंद्रजीत निवासराव यादव पाटील यांनी पत्रकारद्वारे आव्हान आणि अगत्याचे आमंत्रण केले आहे .

