भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

0
185

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि.14(जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, पोलीस निरीक्षक केतकी खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार सुषमा दिवटे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here