
प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा. कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी मित्राच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलीची विक्री केली आहे. १ लाख रुपयांच्या बदल्यात हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील महिलेने गोव्यातील फातिमा फर्नांडिस या महिलेलेसोबत बोलणी केली होती. पुनम ढेंगे असं या निर्दयी आईचे नाव आहे. या बाबतची माहिती मिळताच तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच संबंधित महिला तिचा मित्र सचिन कोंडेकर, स्टॅम्प करणारा किरण पाटील, मुलीला विकत घेणारी फातिमा फर्नांडिस आणि जेरी नोरोन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विक्री झालेल्या मुलीला आणण्यासाठी पोलीसाचे पथक गोव्याला रवाना झाले आहे.

