प्रतिनिधी :राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील वृद्धेचाशेतात दगडाने ठेचून खून, खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट पुरीबुवा. राधानगरी : राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील श्रीमती आक्काताई केशव रामाणे वय ६५ या वृद्ध महिलेचा शेतात दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गुंड गायब आहे तर कानातील कर्णफुले तशीच आहेत. झालेल्या घटनेची फिर्याद वृद्धेचा मुलगा बाळासो केशव रामाणे यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिस विविध अंगाने शोध घेत आहेत.घटनास्थळी राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरतवडे ता राधानगरी येथील आक्काताई रामाणे या डोंगरालगतच्या टेंबूर नावाच्या शेतात उसाला पाजण्यासाठी गेल्या होत्या. आज २३ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आई अजून कशी आली नाही म्हणून शेतात गेला असता त्यांना उसाच्या सरीत आईचा मुत्यूदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसला. ह्या घटनेची माहिती त्यांनी गावचे पोलिस पाटील व राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.घटनास्थळी पोलिस फौजफाटा पोहोचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला. नरतवडे येथील ज्योतिर्लिंग चैत्र असल्याने गावांमध्ये पाळक पाळला असल्याने शेत शिवार कोणीही नव्हते . याची संशयित आरोपीला माहिती असणार याचाच त्याने फायदा घेतला असणार, असा प्राथमिक अंदाज आहे. या खुनाच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यांने घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Home Uncategorized राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील वृद्धेचाशेतात दगडाने ठेचून खून, खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट