कोल्हापूर हादरलं बायको सोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली ; मुलांकडून आईची हत्या

0
382

. प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

कोल्हापूर: कोल्हापुर शहरातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुलानेच आईचा निर्घृण हत्या केली आहे. कोल्हापूर शहरातील साळोखे पार्क परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सादिक मुजावर असं हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचं नाव आहे तर शहनाज मुजावर असं हत्या झालेल्या आईच नाव आहे. सादिक मीजावरने आपल्या आईच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर सुऱ्यानं वार केला. या घटनेत शहनाज मुजावर गंभीर जखमी झाल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.सदर घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सादिक मुजावर हा आपल्या पत्नीसोबत फोनवर बोलत होता. त्यावेळी त्याची आई मध्येच बोलल्यानं त्याला राग आला, याचवेळी रागाच्या भरात त्याने आपल्या आईची निघुर्ण हत्या केली आहे. कोल्हापूर शहरातील साळोखे पार्क परिसरात कौटुंबिक वादातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. सादिकने आपल्या आईच्या छातीवर, पोटावर, पाठीवर सुऱ्यानं वार केले, या घटनेत जखमी झालेल्या शहनाज मुजावर यांचा उपचारआधीच मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here