पुढील २४ तासात राज्यात मुसळधार पाऊसाचा अंदाज ; राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

0
138
 प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा 
                                                           महाराष्ट्रात सध्या मान्सून पूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्यात पुढील २४ तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना,
तसेच हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
याचबरोबर पुणे, सातारा, लातूर, नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here