प्रतिनिधी : मेघा पाटील
कोल्हापूर /प्रतिनिधी :आज दिनांक ५ जुलै 2024 रोजी “यशस्वी मंच” व “मोहिनी पैठणी” यांच्या संयुक्त विद्यमाने मेकअप व हेअर स्टाईल वर्कशॉप घेण्यात आला व वटपौर्णिमेनिमित्त ठसकेबाज उखाणा ऑनलाइन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा व महिलांनी स्वतःला प्रेझेंटेबल कसं ठेवावं यासाठी मेकअप व हेअर स्टाईल वर्कशॉप घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी कोल्हापूर व कोल्हापूरच्या बाहेरून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनेक महिलांनी स्पर्धेच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
“यशस्वी मंच” महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, रोझगराची संधी मिळावी, रोजच्या धकधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा, या उद्देशाने यशस्वी मंचची स्थापना करण्यात आली, अनेक उपक्रम व मनोरंजक कार्यक्रम तसेच आपला व्यवसाय इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी यशस्वी मंचने अनेक महिलांना दिली त्यातून रोजगार व उत्पन्न मिळावा असा व्यासपीठ देण्यात आला,त्यात सोबत विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सौ. मोहिनी वणकुद्रे,मोहिनी पैठणी ग्रुप्स संचालिका व यशस्वी मंचच्या संस्थापिका अध्यक्षा स्वप्नाली जगोजे या होत्या.ब्युटी पार्लरच्या सौ. संगीता संकपाळ यांनी सर्व महिलांना मेकअप व हेअर स्टाईल चे प्रशिक्षण दिले तसेच,उखाणा स्पर्धेत सौ. नेहा निळकंठ वाळकी,या विजेत्या ठरल्या.