महिला आदर्शवादी बनली गंगापूरची लेक पाच महिन्यांत सहा सरकारी नोकरीत निवड

0
192


प्रतिनिधी-प्रदिप अवघडे
कागल तालुक्यातील चिमगाव पासून दोन किलोमीटर आंतरावर आसणारे भुदरगड तालुक्यातील गंगापूर हे छोटे गाव येतील प्रापंचिक जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळतानाच येथील गडहिंग्लज नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात दररोज १० तास अभ्यास करून तिने जिद्दीने ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षांमध्ये मोठे यश मिळविले. त्यामुळे एकाच वर्षी अवघ्या ५ महिन्यांत सरकारी नोकरीतील ६ पदांसाठी तिची निवड झाली आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळच्या गंगापूर येथील शेतकरी कुटुंबातील या जिद्दी लेकीचे नाव आहे नीलम प्रमोद फराकटे.तिचे प्राथमिक शिक्षण गंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण श्रीराम हायस्कूलमध्ये झाले. तिने गारगोटीच्या ‘आयसीआरई’मधून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनची पदविका घेतली.लग्नानंतर गडहिंग्लजच्या डॉ. ए. डी. शिंदे तंत्रनिकेतनमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी व पदविका घेतली. पती इंजि. प्रमोद हे नगरपालिकेत पंतप्रधान आवास योजना विभागाकडे सेवेत आहेत. सध्या ती मुंबई येथे ‘आयटीआय’मध्ये निदेशकपदी कार्यरत आहेत.दरम्यान, जलसंपदा विभागातील आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, तर सातारा व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर तिची निवड झाली. फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधीत ६ सरकारी नोकऱ्यांची संधी तिला चालून आली आहे. लवकरच ती रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता (वर्ग-२) या पदावर रुजू होणार आहे.गंगापूर हेच तिचे माहेर व सासर आहे. तिला शेतकरी वडील आनंदराव नरतवडेकर, आई सुचिता, सासरे जोतिराम फराकटे, सासू आनंदी यांचे प्रोत्साहन लाभले.लग्न ठरले अन् पतीची नोकरी गेली!नीलमचे पती प्रमोद हे गारगोटी पंचायत समितीमध्ये शासकीय योजनेच्या कंत्राटी पदावर नोकरीला होते; परंतु लग्नापूर्वी एक आठवडा अगोदर ती योजना बंद झाल्याने त्यांना कार्यमुक्त केले. त्याची खंत तिच्या मनात होती. त्या अस्वस्थतेतूनच अभ्यास करून तिने हे यश मिळविले आहे.
तलाठी ते सहायक अभियंता पदापर्यंत परीक्षासार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोकरीसाठी पदविकेची अट असल्याने पदवीनंतर पदविका घेतली. लग्नानंतरच संपूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केली. कुठल्याही शिकवणीला न जाता स्वयंअध्ययनातून तलाठी ते सहायक अभियंता पदापर्यंतच्या सगळ्या परीक्षा दिल्या. त्यामुळे तिची सरकारी नोकरीच्या तब्बल ६ पदांसाठी एकाच वर्षी निवड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here