शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी ‘सर्वोच्च’ न्यायालयात सुनावणी

0
129

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचे सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला असून, मंगळवार दि २४ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात याबाबत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिवसेना पक्ष फुटीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांसोबत गेलेल्या आमदारांबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र केले नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वारंवार याबाबत तारीख पे तारीख पडत असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देऊन चिन्हाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवावे असे लेखी पत्र दिले होते.यामुळे अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली होती. आता मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ चिन्ह घड्याळ हे शरदचंद्र पवार यांच्याकडून अजित पवार यांना निवडणूक आयोगाने दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या याचिकेबाबत तारीख पे तारीख पडत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्यावे. अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. शरद पवार गटाने यापूर्वी दोन वेळा हे प्रकरण न्यायालयात मेन्शन केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी घेतली नव्हती. आता शरद पवारांनी केलेली विनंती मान्य होते का हे मंगळवार दि २४ संप्टेबर २०२४ रोजी होणाऱ्या च्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here