बदनामीच्या भितीने माजी सरपंचाने उचलले टोकाचे पाऊल; कोल्हापुर जिल्ह्यात खळबळ

0
104

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे येथे गावातील व्हॉटस् ॲप ग्रुपवर मॅसेज टाकून माजी सरपंचाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विष्णू रामा पाटील वय ६६ असे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मेसेजमध्ये समाविष्ट असलेल्या गावातीलच पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत नेसरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कृष्णा भावकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच हडलगेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संशयिताना अटक करण्यासाठी आक्रमक नातेवाईक व ग्रामस्थांनी नेसरी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.संशयितांना अटक करा; अन्यथा पोलिस ठाण्यासमोर किंवा संशयितांच्या घरासमोर मृतदेह दहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, चंदगडचे निरीक्षक विश्वास पाटील, नेसरीचे सहायक निरीक्षक आबा गाढवे उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक इंगवले यांनी लवकरात लवकर संशयितांना अटक करून कारवाईची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी अंत्यविधी केले.पाटील यांचे गावात रेशन दुकान असून, रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदासह गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रविवार दि १५ संप्टेबर रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांनी त्यांनी गावातील व्हॉटस् ॲप ग्रुपवर त्रासाला कंटाळून व प्रतिष्ठेला घाबरून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकला. गावात या मेसेजची चर्चा सुरू झाली. त्याची माहिती मिळताच नेसरी पोलिसांनी हडलगे गाठले.पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून पाटील यांचा शोध घेतला असता, घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या गणेश मंदिराजवळील डोंगरात ते अत्यवस्थ अवस्थेत आढळले. त्यांच्यावर नेसरी येथे प्रथमोपचार करून गडहिंग्लजच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच रविवार दि २२ संप्टेबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रदीप विष्णू पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू पाटील यांनी गावातील भावेश्वरी ग्रामप्रतिष्ठान या व्हॉट्स् ॲप ग्रुपवर मॅसेज टाकला. कृष्णा भावकू पाटील, शिवराज ल. पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. ते एका महिलेला व तिच्या मुलाला हाताशी धरून मला बदनाम करीत आहेत. म्हणून मी माझ्या प्रतिष्ठेला घाबरून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here