ढगफुटीसदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात रस्त्याला भगदाड, कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

0
39

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा सोमवार दि २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटमार्गाची दाणादाण उडविली आहे. घाटात दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या असून एका ठिकाणी रस्ता खचून भगदाड पडले आहे.सोमवारी सायंकाळी सुमारे दीड तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे भुईबावडा घाटात दहाबारा ठिकाणी दरडी कोसळल्या. या दरडींचे ढीगारे दोन जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे आज २४ संप्टेबर सायंकाळी उशिरापर्यंत घाटमार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ढगफुटीमुळे भुईबावडा घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे सुमारे १५ ते २० फूट लांब भगदाड पडले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तेथून एकेरी वाहतूक सुरु ठेवावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये घाटातील कोसळलेल्या दरडी हटविण्याच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here