कोल्हापूर, दि.26 : उमेदवार निवडणूक प्रचाराशी संबंधित विविध परवानग्यांसाठी अर्ज करण्यासह दाखल केलेल्या नामनिर्देशनाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी आता नवीन आणि अद्ययावत केलेल्या सुविधा 2.0 मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करू शकतात. यापूर्वी, केवळ ऑफलाइन तसेच वेब-आधारित पोर्टलद्वारे परवानगीचा अर्ज भरता यायचा. तसेच केवळ अर्जाच्या सद्यःस्थितीचा मागोवा घेऊ शकत होते. पण आता नवीन अपग्रेडमुळे सुविधा 2.0 ॲप, उमेदवार आणि पक्षांसाठी केवळ एका क्लिक द्वारे प्रचाराशी संबंधित विविध परवानग्या मिळवण्याचे, सद्यस्थिती पडताळण्याचे आणि मंजूरी आदेश डाऊनलोड करण्याचे तसेच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचे, नवनवीन सूचना मिळवण्यासाठीचे ‘वन स्टॉप सोल्यूशन’ ठरणार आहे. सुविधा 2.0 मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरूनही डाउनलोड करता येईल.
निवडणुकांमध्ये उमेदवार आणि पक्षांना आयोगाने सुविधा 2.0 मोबाईल ॲपद्वारे अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. निवडणूक आयोग सुविधा 2.0 मोबाईल ॲप लाँच करुन तसेच नवनवीन तंत्रज्ञान आणून निवडणूक प्रक्रिया सशक्त होण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. जे उमेदवार निवडणुकीच्या वेळी नेहमी विविध परवानगीसाठी फिरत असतात, ते या ॲप मुळे सहज घरबसल्या अर्ज करु शकतात. या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या मोबाइल फोनवरून परवानग्यांचा मागोवा घेऊ शकतात. सुविधा मोबाइल ॲप वापरकर्त्यांना कोणत्याही मोहिमेशी संबंधित परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज, घोषणा आणि इतर कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा देते. ॲपवर नोंदणी केल्यावर संदर्भ आयडी तयार केला जाईल, जो वापरकर्त्यांना त्यांच्या विनंत्यांची स्थिती ट्रॅक करण्यास मदत करेल. परवानगीच्या विनंतीवर निर्णय घेतल्यानंतर, विनंती केल्यावर अर्जाची एक प्रत ॲपवरून डाउनलोड केली जाऊ शकते. वापरकर्त्यांना नामांकन स्थिती, निवडणुकीचे वेळापत्रक आणि नियमित अद्यतने यासारख्या इतर अनेक वैशिष्ट्यांचा वापर करता येईल. सुविधा मोबाईल ऍप्लिकेशन अधिक वापरकर्त्यांसाठी अधिक अनुकूल आहे.
सुविधा मोबाइल ॲप राजकीय पक्ष व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विविध परवानग्या देते. यात हेलिकॉप्टर आणि हेलिपॅडसंबंधित, हवेतील फुगे वापरून प्रचार करणे, पक्षाचे तात्पुरते कार्यालय उभारणे, घरोघरी प्रचार करणे, व्हिडिओ व्हॅन, रॅली, वाहन परवानगी, माहिती पत्रक वाटप परवानगी, लाऊड स्पीकर असलेले वाहन, बॅनर व ध्वज प्रदर्शित करणे इ. परवानग्या या ॲपव्दारे दिल्या जातात.
अँड्रॉइड सुविधा 2.0 मोबाइल ॲपसाठी लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1
iOS सुविधा 2.0 मोबाइल ॲपसाठी लिंक:
https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487