प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर :दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी चार ते नऊ या वेळेमध्ये GBN ( ग्रो बिजनेस नेटवर्क ) दुसरा वर्धापन सोहळ्याचे आयोजन केले होते. या जीबी एन ग्रुपला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. जी बी एन या ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजक व उद्योजिका यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या ग्रुप बिजनेस नेटवर्कच्या माध्यमातून विविध व्यवसायासंदर्भामधील जाहिरात, प्रमोशन, विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारे उद्योजक व उद्योजिका हे करत असलेले व्यवसाय या संदर्भातील सर्व माहिती मीटिंग द्वारे त्याचबरोबर कार्यशाळा आयोजित करून लोकांच्या पर्यंत माहिती पोहोचवली जाते.
या उपक्रमामुळे उद्योजकांना याचा खूप मोठा फायदा होताना दिसत आहे. अल्पावधीत ग्रो बिझनेस नेटवर्क GBN यांनी आपली प्रतिमा चांगली प्रस्थापित केली आहे. GBN ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत गोखले व संस्थापक उपाध्यक्ष संज्योत दप्तरदार यांनीव्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा फार मोठा फायदा व्यवसायिकांना होताना दिसत आहे. GBN ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत गोखले व संस्थापक उपाध्यक्ष संज्योत दप्तरदार यांनी सुरू केलेले GBN म्हणजेच ग्रो बिझनेस नेटवर्कहे अल्पावधीत नावा रुपाला येताना दिसत आहे. याच्या शाखा कोल्हापूर बरोबर कराड सांगली पुणे येथे आहेत. या वर्धापन दिनानिमित्त कराड सांगली पुणे व कोल्हापुरातील सर्व सभासद या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी लहानांपासून जेष्ठांपर्यंत मनमोराआद नाचण्याचा व गाण्याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खास महिलांनी फॅशन शो, नाटक, त्याचबरोबर गीत गायनाचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमा वेळी लहान मुलांनीही आपला डान्स सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकलीत. या कार्यक्रमा वेळी अँकर पुष्टी यांनी स्पॉट गेम घेऊन जीबी एन ग्रुपच्या सभासदांचा आनंद द्विगणित केला. या कार्यक्रमा वेळी GBN ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत गोखले व संस्थापक उपाध्यक्ष संज्योत दप्तरदार यांचा सत्कार GBN ग्रुप पुणे यांनी पुणेरी पगडी घालून सत्कार केला. त्याचबरोबर जिल्ह्यामधील GBN ग्रुप विशेष लोकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. GBN ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत गोखले व संस्थापक उपाध्यक्ष संज्योत दप्तरदार यांनी या GBN ग्रुपच्या स्थापनेपासून चा प्रवास यावेळी मनोगतातून व एलईडी स्क्रीनवर व्हिडिओ प्रसारित करून व्यक्त केला.या कार्यक्रमाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.या कार्यक्रमासाठी कोल्हापूर कराड सांगली आणि पुणे येथील पदाधिकारी सभासद उपस्थित होते.