प्रतिनिधी रोहित डवरी
खोची प्रतिनिधी :श्री भैरवनाथ जन्मकाळ सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात : स्थानिक सल्लागार उपसमितीचे पदाधिकारीमहाराष्ट्र कर्नाटक राज्याचे आणि सीमा भागातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र खोची श्री भैरवनाथांचा जन्म उत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. प्रति वर्षाप्रमाणे श्रीक्षेत्र भैरवनाथ देवाचा जन्मोत्सव सोहळा कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक २३/ ११/ २०२४ रोजी रात्री १२ वाजता साजरा होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने दिवसभर अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी ३ते ६, सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत भाविक भक्तांच्या साठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री ८ ते ९.३० श्री भैरवनाथाची आरती होईल. ९ ते ११.३० पर्यंत श्री विठ्ठल भजनी मंडळ खोची यांचे सुश्राव्य असे भजन असणार आहे. श्री नाथपंथी डवरी समाज यांच्या मंत्रोच्चारात श्री भैरवनाथाचा जन्म सोहळा रात्री १२ वाजता पार पडेल. तसेच भावी भक्तांच्या मनोरंजनासाठी रात्री १२.३० ते ३वाजेपर्यंत सचिन लोहार सावर्डे प्रस्तुत आधुनिक संगीत सोंगी भजनी मंडळ यांचा कार्यक्रम असणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी प्रथेप्रमाणे महा अभिषेक, महापूजा ,आणि आरतीचे आयोजन केले आहे.यावर्षीचे सर्व नियोजन श्री भैरवनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व खोची ग्रामस्थ आणि गावातील तरुण मंडळ आणि समस्त गुरव गोसावी नातपंथी डवरी समाज खोची यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तसेच नवीन निर्माण झालेल्या स्थानिक उपसमितीमुळे भाविकांचे नियोजन आणि योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करता येत आहेत . स्थानिक समिति मुळे भाविकांच्या मध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अशी माहिती श्री भैरवनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी यांनी दिली आहे. तरी सर्वांनी या श्री भैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याल उपस्थित रहावे