कोल्हापुरात मोठी कारवाई! तोतया निवडणूक तपासणी अधिकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश; व्यावसायिकाकडून २५ लाख केले लंपास

0
31

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर: १२ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा फायदा घेत तोतया निवडणूक अधिकारी बनून तावडे हॉटेल येथे एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रक्कम चार ते पाच जणांच्या टोळीने लंपास केल्याचे घटना घडली होती यानंतर पोलीस प्रशासन मध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या घटनेचा छडा लावत, या गुन्ह्यातील संजय महादेव किरणगे वय ४२, रा. विक्रमनगर, ता. करवीर, अभिषेक शशिकांत लगारे वय २४ आणि विजय तुकाराम खांडेकर वय२८, दोघे रा. उचगाव, ता. करवीर यांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली. स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव रा. पाचगाव आणि हर्षद खरात रा. राजारामपुरी या दोघांचा अद्याप शोध सुरू असून लुटीतील २५ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान १२ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास तावडे हॉटेलच्या हायवे ब्रिजच्या बाजूला सर्विस रोडवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, रा. बागल चौक, कोल्हापूर यांना ५ लोकांच्या टोळीने निवडणूक तपासणी अधिकारी असल्याचे भासवत गाडी तपासणी करून २५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट लंपास केल्याची घटनासमोर आली होती. विधानसभा निवडणूकीची आचार संहिता सुरू असल्याने तोतया निवडणूक तपासणी अधिकारी भासवत गुन्हा केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तात्काळ तपास चालू करण्याच्यादृष्टीने सुचना दिल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here