जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटली, हूपरीतील एकाच कुटुंबातील चार जणांचा राजस्थान मध्ये अपघाती मृत्यू

0
182

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा जयपूर : राजस्थान मधील पाली जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.सदर कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी होते. गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन झुडपात पलटी झाली. रात्रीच्या अंधारामुळे त्या ठिकाणी अपघात झाल्याचे स्थानिकांना लवकर कळाले नाही.गुराना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्यानंतर कार रस्त्यावर जाऊन पलटली. संदेराव पोलीस स्टेशनचे अधिकारी लक्ष्मण सिंह यांनी सांगितले, “पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग १६२ वर टोल बुथपासून १ किमी अंतरावर कार गुरांवर धडकली. त्यानंतर महामार्गावरून खाली जाऊन कार झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की या कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना पाली आणि संदेराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे मध्यमवयीन व्यक्ती, त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा जागीच ठार झाले. कार चालवत असलेले नातेवाईक आणि पुतणे जखमी झाले.”अपघातामधील कुटुंब हे महाराष्ट्रातील हुपरी जि. कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. अपघातग्रस्त कुटुंब हे सोन्या-चांदीचा व्यवसाय करण्यासाठी स्थाईक झाले होते. हे कुटुंब राजस्थान मधील शिवगंज येथील मित्र किशोर प्रजापत यांच्याकडे व्यवसायानिमित्त आले होते. जोधपूरहून रात्री परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यापासून ५० फूट अंतरावर असलेल्या एका झाडाला कार धडकल्यानंतर कारमध्ये लोक अडकून पडले होते. हा अपघात टोल प्लाझापासून अवघ्या एक किलोमीटरवर होऊनही घटनास्थळी रुग्णवाहिका किंवा पेट्रोलिंग पथक अर्ध्या तासातही पोहोचले नव्हते. लोकांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा- मुलगी यांचा मृत्यू झाला. अपघातांची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत कारमध्ये अडकलेले ५० वर्षीय बाबुराव नारायण चव्हाण, पत्नी सारिका, १९ वर्षांची मुलगी साक्षी आणि १७ वर्षांचा मुलगा संस्कार या चौघांचा मृत्यू झाला. मृत प्रवासी हे कोल्हापूर येथील हुपरी शहरातील संभाजी माने नगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. कार चालवत असलेले पुरेंद्र जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर १९ वर्षीय चिन्मय मुलगा रवी याला सादेराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबतची माहिती काल शनिवारी उशिरा कळाली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here