प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील निवडणूक खर्च अनुषंगिक यंत्रणांचा घेतला आढावा..
कोल्हापूर, दि.17* : मतदानपूर्व 72 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी या काळात वस्तू खरेदी, ऑनलाईन ट्रांझेक्शन, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिल्या. ते कोल्हापूर येथे निवडणूक अनुषंगिक खर्च यंत्रणांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्यांना सादर केला. त्यांनी कोल्हापूरसह सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचाही आढावा दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, खर्च निरिक्षक दिनेश कुमार मीना, खर्च निरिक्षक श्रीमती आर. गुलजार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, खर्च नोडल यांच्यासह आयकर विभाग, राज्य व केंद्रीय वस्तू व सेवा कर, लीड बँक, राज्य उत्पादक शुल्क यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदूर्ग व रत्नागिरी येथील संबंधित अधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 11 कोटी 76 लाख रूपये किंमतीची रोख रक्कम, अवैध मद्य, ड्रग, सोने-चांदी, वाटपासाठीच्या वस्तू पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.यावेळी गोवा राज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीबाबत सिंधुदूर्ग सीमेवरील यंत्रणेने लक्ष ठेवून ती महाराष्ट्रात दाखल होणारच नाही याची काळजी घ्यावी. तसेच कर्नाटक राज्यातूनही वाहतूक होण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरिक्षक बालकृष्णन यांनी दिले. तसेच पकडण्यात येणाऱ्या सर्व अवैध मद्य कोठून आले व कुठे जाणार राज्य व केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागांनी जास्त प्रमाणात वाटप साहित्यांची खरेदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर जता होतो. तसेच विविध ठिकाणी अशा वस्तूंचे गोडावून असतात त्या ठिकाणांवर छापे टाकून संशयित बाबींची तपासणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. *प्रत्येक संशयित ऑनलाईन ट्रांझेक्शन तपासा*निवडणूक काळात मोठ्या रकमांबरोबरच लहान लहान संख्येने जास्त ट्रांझेक्शन होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत तपासणी करा. कोणत्याही प्रकारे मतदारांवर परिणाम करणाऱ्या अर्थिक व्यवहार होणारच नाहीत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करण्याचे निर्देश श्री.बालकृष्णन यांनी दिले. रोख रकामांची वाहतूक होत असलेल्या बँकेच्या वाहनामधील ओळख सुविधा जसे की क्यूआर कोड आदी बाबत चांगली प्रक्रिया राबवा. याचबरोबर सहकारी बँकांमधील सर्व व्यवहारांवर प्रत्येक तासाला लक्ष ठेवून संशयित प्रकरणांची माहिती इतर विभागांना पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.*सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावरील अर्थिक व वस्तू वाटपांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या*शेवटच्या काही तासांमधील प्रचारात गैर मार्गाने मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपाची तक्रार सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावर मिळाल्यास गतीने संबंधितावर कार्यवाही करावी. तसेच या दोन्ही तक्रारीसाठी असणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांनी सजग राहून मतदान प्रक्रिया पारदर्शक व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने करावे. सोशल मीडियावर जर कोणी अशा चुकिच्या प्रक्रियेचे व्हिडोओ शेअर केले तरी तो संदर्श घेवून त्या ठिकाणी भरारी पथक पाठवा. पेड न्यूजबाबतही या काळात चांगल्या प्रकारे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.