
प्रतिनिधी मेघा पाटील
शिरूर : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माईनगरी (बो-हाडे मळा) शिरूर येथे शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ गुरूवारी (ता.१४) रोजी पद्मश्री पोपटराव पवार(आदर्श सरपंच- हिवरे बाजार), श्री नानजी भाई ठक्कर (ठाणावाला, शिक्षणमहर्षी) यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

या वेळी स्नेहालयाचे संस्थापक गरीश कुलकर्णी,मंचर येथील उद्योजक गोविंदशेठ खिलारी, शिरूर येथे उद्योजक मनसुख शेठ गुगळे, व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकासजी पोखरणा, ऊर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश शेठ कुतवळ, शिरूर येथील उद्योजक संतोष मोरे, संजय शिंदे, शिरुर ग्रामीणचे उपसरपंच बाबाजी आण्णा वर्पे, माजी सरपंच अरूण तात्या घावटे,जेष्ठ प्रत्रकार नितीन बारवकर, डॉ. परवेझ बागवान, वासुदेव व्हटकर साहेब, संभाजीनगर येथील उद्योजक नानासाहेब आगलावे, माई देशमुख, ममता सपकाळ, दिपक गायकवाड, विनय सपकाळ आदी मान्यवर व माई परिवारावर प्रेम करणारे शेकडो नागरिक उपस्थित होते. एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात……. रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, “माईंचे कार्य खूप महान आहे. त्यांच्या पश्चात माई परिवारातील सर्व सदस्य सातत्याने आणि प्रामाणिक पणे हे काम पुढे नेत आहेत. त्यांना शासकीय अनुदान नाही. त्यामुळे अनाथ बालकांना हक्कांचा निवारा, अन्न, वस्त्र, शिक्षण मिळावे. यासाठी समाज म्हणून आपल्या सर्वांनी शक्य ती फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे. माईंचे कार्य पुढे अविरत सुरु राहणार असून त्यासाठी आपण सर्वांनी गणगोत व्हावे.” असे आवाहन त्यांनी केले.


शिक्षणमहर्षी नानजीभाई ठक्कर म्हणाले, “ईश्वर सर्व काही देत असतो. आपण फक्त घेण्याचे काम न करता, समाजाचे आपण काही तरी देणे लागतो. ही भावना नेहमी मनात ठेवली पाहिजे. व्हटकर परिवाराने माईंच्या बालकांना हक्काचे घर मिळावे म्हणून कोट्यवधी रुपयांची जागा घेऊन दिली. त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनाथ लेकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनय सपकाळ यांनी सुरू केलेली चलवलंब शिरूर मध्ये ‘माईनगरी’ च्या रूपाने साकारण्यासाठी तुम्ही आम्ही योगदान देण्याची वेळ आली आहे. शिरूरकर योगदान देऊन ‘माईनगरी’ अनाथ लेकरांच्या हक्काचे घर लवकरच पूर्ण करतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक माईनगरी चे संचालक विनय सिंधूताई सपकाळ यांनी तर, सुत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले. आभार ममता सिंधूताई सपकाळ यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश सपकाळ, संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले, मीनाक्षी लटांबळे,दिनेश लोखंडे, दत्तात्रय जाधव, आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
“मी आई झाले,तुम्ही गणगोत व्हा” समाजातील दानशूर व्यक्तींना विनम्र आवाहन
समाजातील दानशूर व माई परिवारा वर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी सहकार्य केल्याने, आदरणीय माईं चे हे महान कार्य पुढे सुरू असून त्याचा शेकडो अनाथ लेकरांना फायदा होत आहे. नागरिकांच्या प्रेमाच्या जोरावर शिरूर येथील अनाथ लेकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘माईनगरी’ शिरूर येथील शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाची उभारणी करत आहोत. संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या जोरावर हे महान कार्य सुरू आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी “माईनगरी” आश्रमाच्या उभारणीला मदत करावी.असे आवाहन माई नगरी चे संचालक विनय सिंधुताई सपकाळ यानी केले आहे… मदत करण्यासाठी 9049474544 नंबर वर संपर्क करावा. असे आवाहन संचालक विनय सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.